उम्म्या आणि कॉल सेंटर...





उम्म्या कॉल सेंटर ला फोन करतो..
Cc मी आपल्याला कश्या प्रकारे मदत करू शकतो?

उम्म्या - मी नोट पॅड वर टाईप करत होतो..अचानक सगळे शब्द गायब झाले..
Cc - गायब झाले?

उम्म्या हो..मी आता काहीही टाईप केलं तर ते स्क्रीन वर उमटत नाहीये..
Cc - तुम्ही नक्की नोट पॅड वर आहात की त्याच्या बाहेर आलात..
उम्म्या - माहित नाही..
Cc - बरं...तुम्हाला 'C ' प्रोम्प्ट दिसतोय का..
उम्म्या - 'C ' प्रोम्प्ट म्हणजे?
Cc बरं..मला सांगा तुम्हाला कर्सर दिसतोय का स्क्रीन वर..
उम्म्या - अहो काहीच दिसत नाहीये..तेच तर सांगतोय कधीचं...
Cc - तुमचा मॉनिटर चालू आहे की बंद?
उम्म्या - मॉनिटर म्हणजे काय?

Cc - तुमच्या टेबल वर T .V सारखा जो डब्बा आहे तो..
उम्म्या - ते कसं ओळखू ?
Cc - मॉनिटर च्या मागे पॉवर केबल आहे का कनेक्ट केलेली?
आणि मॉनिटर चा लाईट लागतो का?
उम्म्या - पॉवर केबल लावलेली आहे..पण
लाईट नाही लागत आहे..
Cc - बरं..मॉनिटर च्या मागची दुसरी केबल तुमच्या कम्प्युटर
ला जोडलेली आहे का?
उम्म्या मला नाही दिसत..
Cc - म्हणजे ?
उम्म्या - अहो इथे अंधार आहे..फक्त खिडकीचा प्रकाश येतोय..
Cc - मग लाईट चालू करा ना..
उम्म्या - अहो..लाईट गेलीये कधीपासून....
Cc - ओह !!
मला आता कळाला प्रॉबलेम...एक काम
करा..तुमचा कम्प्युटर पैक करा...आणि जिथून
आणलाय त्याला परत द्या..
उम्म्या - का हो काय झालं?
आणि त्यांना काय सांगू परत देताना?
Cc सांगा की मी कॉम्प्युटर घेण्याच्या लायकीचा नाहीये..
मला अक्कल आली की परत घेईन........

No comments:

Post a Comment